Friday, October 31, 2025

पुनर्वसनाचे प्रयोग....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------
पुनर्वसनाचे प्रयोग
जो गरजवंत असेल त्याचा,
वापर करून घेतला जातो.
आपल्या राजकीय पुनर्वासनाचा,
राजकीय घाट घातला जातो.
आंदोलन,संप आणि मोर्चे,
संविधानिक मार्ग निवडले जातात.
राजकीय पुनर्वसनाचे प्रयोग,
मीडियाला सुद्धा आवडले जातात.
गरजवंतांच्या गरजा आणि प्रश्न,
जसे आहे तसेच राहून जातात !
संविधानिक मार्गानेच मग,
राजकीय पुनर्वसनं होऊन जातात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9079
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
31ऑक्टोबर2025

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...