आजची वात्रटिका
-------------------
विखारी फुत्कार
गल्लीपासून दिल्लीपर्यंत,
धार्मिकतेचे फुत्कार आहेत.
धार्मिकतेच्या फुत्काराखाली,
माणुसकीचे चित्कार आहेत.
धार्मिकतेच्या फुत्काराला,
जातीय फुत्काराची जोड आहे.
ज्याचा साधला जातो स्वार्थ,
त्याला सगळेच गोड आहे.
जमेल तसा जमेल तिथे,
या फुत्कारांचा विखार आहे !
ज्यांचा आहे छुपा पाठिंबा,
त्यांची मानसिकता भिकार आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9057
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
7ऑक्टोबर2025

No comments:
Post a Comment