Thursday, October 30, 2025

मुक्काम पोस्ट मराठवाडा..... आजची वात्रटिका


आजची वात्रटिका 
----------------------------

मुक्काम पोस्ट मराठवाडा 

डोळ्यातले पाणी आटताच,
पुन्हा नव्याने ढग दाटून आले. 
परतीच्या पावसाने मग, 
उरले सुरले सगळे लुटून नेले.

मोसमी तो मोसमीच होता, 
तोही बेमोसमी पडून गेला.
ओल्या जखमेवरची खपली,
पुन्हा अवकाळी काढून गेला.

जणू आपला सगळा बॅकलॉग, 
पाऊस भरून काढतो आहे !
कोरड्या आणि ओल्या विरुद्ध,
दुष्काळी मराठवाडा लढतो आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 10
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
30ऑक्टोबर2025
----------------------------

No comments:

अवकालीन तुलना...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- अवकालीन तुलना कोणतीही तुलनात्मक चर्चा, विध्वंसक वळण घेऊ शकते. समकालीकांची समकालीकांशीच, विधायक तुल...