आजची वात्रटिका
-------------------
लाईव्हबहाद्दर समाजसुधारक
स्वार्थी समाज सुधारक जास्त,
नि:स्वार्थी मात्र थोडे आहेत.
लाईव्हबहाद्दर समाजसुधारकांचे,
अगदी लाईव्ह असे लढे आहेत.
लाईव्ह विरुद्ध लाईव्ह आहेत,
पोस्ट विरुद्धही पोस्ट आहेत.
फॉलोवर्स आणि कमाईसाठी,
सगळ्यांचे अट्टहासही स्पष्ट आहेत.
पैसा,प्रसिद्धी आणि स्टंटबाजी,
एवढेच त्यांच्या डोक्यात आहे !
उरली सुरली विश्वासार्हताही,
लाईव्ह बहाद्दरांमुळे धोक्यात आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9067
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
17ऑक्टोबर2025

No comments:
Post a Comment