Saturday, October 18, 2025

सेम टू सेम....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-------------------

सेम टू सेम

हे त्यांना ठोकायला लागले,
ते यांना ठोकायला लागले.
सगळेच एकमेकांवरती,
गरळ ओकायला लागले.

तिकडचेही ऐकून घेतात,
इकडचेही ऐकून घेतात.
बाहिलवणारे असले की,
लोकसुद्धा बहिकून घेतात.

तिकडून यांची नक्कल आहे,
इकडून त्यांची नक्कल आहे !
जमलेली गर्दी सांगते,
गरजवंताला कुठे अक्कल आहे?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9068
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
18ऑक्टोबर2025

No comments:

ऑपरेशन फोडाफोडी

आजची वात्रटिका ---------------------------- ऑपरेशन फोडाफोडी आज यांचे त्यांचे फुटले, उद्या दुसऱ्याची बारी आहे ऑपरेशन फोडाफोडी, सगळीकडूनच जारी...