Thursday, October 9, 2025

पोपटराव बोलघेवडे....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

पोपटराव बोलघेवडे

इतरांना डोस पाजताना,
त्यांचे आरोप शेलके आहेत.
त्यांचे त्यांनाच माहीत असते,
ते स्वत: फक्त बोलके आहेत.

त्यांना आपला बोलघेवडेपणा,
समाज सुधारणा वाटते आहे.
स्वतःच्या पोपटपंचीतूनच,
त्यांना समाधान भेटते आहे.

खोट्या समाधानावरच,
त्यांची सगळी मदार आहे !
रोखठोक काहीच नाही,
सगळा मामला उधार आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9059
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
9ऑक्टोबर2025
 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...