Wednesday, July 3, 2019

पाहुणे कलाकारआजची वात्रटिका
-----------------------------------
पाहुणे कलाकार
एकाच पक्षात नाही तर,
सर्वत्र हाच प्रकार घडतो आहे.
पाहुण्या कलाकारांचाच
पाहुणचार वाढतो आहे.
जे कानामागून आले,
तेच आज तिखट आहेत !
पाहुण्या कलाकारांमुळे
घराच्यांच्या अवस्था बिकट आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6996
दैनिक झुंजार नेता
3जुलै2019
-----------------------------
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

No comments:

निषेध !

आजची वात्रटिका ---------------------- निषेध ! सांगताही येत नाही, कधी काळचा रोष आहे? 'मीटू मीटू' च्या वादळाला, राहून राहून जोश आहे. क...