Tuesday, July 30, 2019

मेगा भरतीआजची वात्रटिका
----------------------------------------
मेगा भरती
बेरोजगारांचा झाला अपेक्षाभंग,
सरकारची मात्र स्वप्नपूर्ती आहे.
अगदी दिलेल्या शब्दाला जागत,
सरकारची खरंच 'मेगा भरती' आहे.
सरकार नोकऱ्यांची भरती सोडून,
वेगळीच 'मेगा भरती' करीत आहे !
दुसऱ्या पक्षातील नेते मंडळी,
आपल्यात कोंबू कोंबू भरीत आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5564
दैनिक पुण्यनगरी
30जुलै2019
-----------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
----------------------------------------
नमस्कार,
आपले अभिप्राय आणि सूचना मला सतत मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरत आलेल्या आहेत.
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही त्या शेअर कराव्यात अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

No comments: