Thursday, July 18, 2019

दास्तान-ए-पाकिस्तान



आजची वात्रटिका
-----------------------------------
दास्तान-ए-पाकिस्तान
सोकलेल्या पाकिस्तानला
आता सोकीस्तान म्हटले पाहिजे.
त्याचे सततचे भुंकणे पाहून,
त्याला भोकीस्तान म्हटले पाहिजे.
नाक कापले तरी भोके कायम,
अशी पाकिस्तानची दास्तान आहे !
जसा तो फेकीस्तान आहे,
तसा तो अतिरेकीस्तान आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5512
दैनिक पुण्यनगरी
18जुलै2019
----------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
----------------------------------------
नमस्कार,
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

No comments:

दैनिक वात्रटिका24एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -322 वा

दैनिक वात्रटिका 24एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -322 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Lj6fYs7HXzulsl3-eEaC...