Tuesday, July 16, 2019

गुरुकृपा



आजची वात्रटिका
-----------------------------------
गुरुकृपा
सगळी पोलखोल होऊनसुद्धा,
शिष्यांच्या श्रद्धा अपार आहेत.
काही गुरूंच्या गुरुकृपेचे,
चढ्या भावाने व्यापार आहेत.
कुणाच्या गुरुकृपेचा बाजार,
कुणाच्या गुरुकृपा 'सेल'मध्ये आहेत !
हीही 'गुरुकृपा'च म्हणावी लागेल,
सध्या बरेच गुरु जेलमध्ये आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5510
दैनिक पुण्यनगरी
16जुलै2019
----------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
नमस्कार,
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

No comments:

दैनिक वात्रटिका 23एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 23एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -321 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1L7d09rSTvZKajObapVCl...