Tuesday, July 30, 2019

तू चल,मैं आया



आजची वात्रटिका
----------------------------------------
तू चल,मैं आया
पक्षांतरासारखी गंभीर बाब,
आता विनोदी होऊ लागली.
तू चल,मैं आया.....
अशी निरोपाची वर्दी येऊ लागली.
हसावे की रडावे?
अशी विचित्र वेळ आहे ?
घड्याळही गडबडून टिकटिले,
हा दैवगतीचा खेळ आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7023
दैनिक झुंजार नेता
30जुलै2019
-----------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
----------------------------------------
नमस्कार,
आपले अभिप्राय आणि सूचना मला सतत मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरत आलेल्या आहेत.
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही त्या शेअर कराव्यात अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

No comments:

दैनिक वात्रटिका29मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -296वा

दैनिक वात्रटिका 29मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -296वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/16Y5CPWm1eVe-mvmywM7Inn...