Friday, July 26, 2019

फुटीर उद्योगआजची वात्रटिका
-----------------------------------------
फुटीर उद्योग
कुणाचे फुटीर उद्योग आहेत,
कुणाचे कुटीर उद्योग आहेत.
घुसखोरांची चलती असल्याचे,
मोठे राजकीय योग आहेत.
वळवावळवीचे रूपांतर,
आता चक्क पळवापळवीतआहे !
पक्षबांधणीचे रूपांतर,
घुसखोरांच्या जुळवाजुळवीत आहे!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7019
दैनिक झुंजार नेता
26जुलै2019
----------------------------------------
आठवणीतील 
वात्रटिका
----------------------------------------
लोकशाहीच्या वल्गना
बाप केंद्रात,मुलगा राज्यात,
जिल्हा परिषदेत नातू असतो.
कुणी म्हणायला गेले तर
जनकल्याण हाच हेतू असतो.
उरलेल्या ठिकाणी
लेकी-सुना बसवल्या जातात !
लोकशाहीच्या वल्गना
पद्धतशीर प्रसवल्या जातात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-2412
दैनिक पुण्यनगरी
19जुलै2010
-----------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
----------------------------------------
नमस्कार,
आपले अभिप्राय आणि सूचना मला सतत मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरत आलेल्या आहेत.
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही त्या शेअर कराव्यात अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com

No comments:

टेक केअर