Sunday, July 28, 2019

बोला 'फुला' ची गाठ



आजची वात्रटिका
-----------------------------------------
बोला 'फुला' ची गाठ
पूर्वी तरी फक्त मतदान जायचे,
आता भाजपात नेतेही जाऊ लागले.
इव्हीएम मशिनसारखेच,
भाजपामध्ये पक्षांतर होऊ लागले.
इव्हीएम हॅकींग सिद्ध व्हायचेय,
पण आता जणू नेतेच हॅक आहेत !
जे काल हल्लाबोल करीत होते,
ते आता जागच्या जागी पॅक आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5562
दैनिक पुण्यनगरी
28जुलै2019
-----------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
----------------------------------------
नमस्कार,
आपले अभिप्राय आणि सूचना मला सतत मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरत आलेल्या आहेत.
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही त्या शेअर कराव्यात अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com

No comments:

दबाव तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- दबाव तंत्र एकमेका साह्य करू.. जरी हा मंत्र चालू आहे. तरीही मित्रांचे मित्रांवरती, दबाव तंत्र चालू ...