Friday, July 19, 2019

राजकीय यात्रा



आजची वात्रटिका
-----------------------------------
राजकीय यात्रा
यात्रा कोणतीही असो,
तिचा काहीतरी हेतू असतो.
जसे आजोबा म्हटले की,
त्याला नक्कीच नातू असतो.
कितीही दडवले तरी,
यात्रांचे हेतू स्पष्ट होतात !
कधी होतो छत्तीसचा आकडा,
तर कधी त्याचेच त्रेसष्ट होतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7012
दैनिक झुंजार नेता
19जुलै2019
--------------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
----------------------------------------
नमस्कार,
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

No comments:

दैनिक वात्रटिका18एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -316वा

दैनिक वात्रटिका 18एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -316वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1H7R0AkBWdW9aUDYPkGh5Z...