Wednesday, July 17, 2019

बुद्धी ग्रहण



आजची वात्रटिका
-----------------------------------
बुद्धी ग्रहण
अमक्याने बघायचे नाही,
तमक्याने बघायचे नाही.
खाऊ-पिऊ नये इथपर्यंत ठीक,
पण ग्रहणकाळात हागायचे नाही?
चुकीचे पेरले म्हणून तर,
चुकीचेच उगलेले आहे !
ग्रहण चंद्रा-सूर्याला नाही,
ग्रहण बुद्धीला लागलेले आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7010
दैनिक झुंजार नेता
17जुलै2019
----------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
----------------------------------------
नमस्कार,
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

No comments:

दैनिक वात्रटिका25एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 25एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -323 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Lj6fYs7HXzulsl3-eEaC...