Sunday, July 14, 2019

चमत्कार दर्शन



आजची वात्रटिका
-----------------------------------
चमत्कार दर्शन
कोणत्याही चमत्कारांचे दर्शन
फक्त भक्तांनाच कसे होते?
श्रद्धा सार्वजनिक झाली की,
श्रद्धेचे आपोआप हसे होते.
आपल्याबरोबर दुसऱ्याच्याही
श्रद्धेची वाट लावली जाते !
सगळे तोंडावर आपटले की,
दाताखाली जीभ चावली जाते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5508
दैनिक पुण्यनगरी
14जुलै2019
-----------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
--------------------------------
नमस्कार,
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

No comments:

दैनिक वात्रटिका19एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -317वा

दैनिक वात्रटिका 19एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -317वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Hd6EtBLdFyAAoFz3kRowp...