Monday, July 8, 2019

पाऊसकोंडी



आजची वात्रटिका
-----------------------------------
पाऊसकोंडी
कुठे पूर,कुठे महापूर,
कुठे पावसाचा धूर आहे.
कुठे केवळ हजेरी,
कुठे नुसती भुरभूर आहे.
कसोटी,वनडे,टी-ट्वेन्टी,
अशी पावसाची हॅटट्रीक आहे.
कुठे चिबाडलेली राने,
कुठे करपलेले पीक आहे.
असून अडचण,नसून खोळंबा,
पाऊस आशेवर पाणी फिरवतो आहे !
ढग अडवून,ढग मिरवून,
पाऊस माणसाची जिरवतो आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5502
दैनिक पुण्यनगरी
8जुलै2019
-----------------------------
नमस्कार,
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com

No comments:

दैनिक वात्रटिका25एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 25एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -323 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Lj6fYs7HXzulsl3-eEaC...