Friday, July 12, 2019

क्रिकेट वेड्यांसाठी



आजची वात्रटिका
-----------------------------------
क्रिकेट वेड्यांसाठी
कालचा बलाढ्य संघ,
अचानक दुबळा वाटू लागला.
गल्लोगल्लीतला क्रिकेटतज्ञ,
वाट्टेल ते छाटू लागला.
याला काढा,त्याला ओढा,
आपली आपणच उडवू लागले.
काल ज्यांना डोक्यावर घेतले,
त्यांनाच पायदळी तुडवू लागले.
क्रिकेटप्रेमी व्हायला शिका,
क्रिकेटवेडे होऊ नका !
पराभवाचे विश्लेषण नक्की होईल,
पण हातघाईवर येऊ नका !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7007
दैनिक झुंजार नेता
14जुलै2019
-----------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
--------------------------------
नमस्कार,
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com

No comments: