Sunday, July 7, 2019

धावा-धावक्रिकेट विश्वकप
स्पेशल वात्रटिका
---------------------------
धावा-धाव
प्रत्येक ओव्हर मध्ये,
आपली धावाधाव असते.
फक्त चौकार आणि षटकारांची,
आपल्याला हाव असते .
फटकेबाजी ऐवजी कधी कधी,
धावाही चोराव्या लागतात !
आयुष्य म्हणजे क्रिकेटच,
जिथे इच्छाही माराव्या लागतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------
टोपीवर टोपी 
दैनिक लोकप्रश्न
26फेब्रुवारी 2003
-----------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
--------------------------------
नमस्कार,
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com

No comments:

रिटर्न गिफ़्ट