Friday, July 26, 2019

पावसाळी विचार

-----------------------------------------
पावसाळी विचार
पाऊस न पडण्यामागे,
आपलाच सिंहाचा वाटा आहे.
आता मात्र पावसासाठीही,
आपलाच आटापिटा आहे.
हवे ते करायचे सोडून,
नको तो घोळ घालीत आहेत.
कुठे कुणाचे लग्न तर,
कुणाला अंघोळ घालीत आहेत.
पावसाच्या विज्ञानाची गणितं,
डोक्यात घुसायला हवेत !
उपाय कृत्रीम नकोत,
ते नैसर्गिक असायला हवेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5560
दैनिक पुण्यनगरी
26जुलै2019
-----------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
----------------------------------------
नमस्कार,
आपले अभिप्राय आणि सूचना मला सतत मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरत आलेल्या आहेत.
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही त्या शेअर कराव्यात अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com

No comments:

दैनिक वात्रटिका26एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 26एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -324वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1N42gbSXBLD3hpxa6K1aUN...