Friday, October 31, 2025
दैनिक वात्रटिका l 30ऑक्टोबर 2025वर्ष- पाचवेअंक -139 वा
जादूचे प्रयोग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
जादूचे प्रयोग
आवाक् झाले कंट्रोल युनिट,
चक्रावलेले व्हीव्ही पॅट आहे.
जादूचे प्रयोग ठरवणे,
हा जरा अजबच थॉट आहे.
हॅकिंगचे केले पॅकिंग,
म्हणे प्रोग्रामिंगमध्ये खुट्टी आहे !
जादूच्या नव्या खेळावरती,
बॅलेट युनिटचीही शिट्टी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 11
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
31ऑक्टोबर2025
पुनर्वसनाचे प्रयोग....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
Thursday, October 30, 2025
मुक्काम पोस्ट मराठवाडा..... आजची वात्रटिका
दैनिक वात्रटिका l 29ऑक्टोबर 2025वर्ष- पाचवेअंक -138वा l पाने -57
असमर्थनीय...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
असमर्थनीय
पाहिजे त्यांची दातखिळी बसली,
त्यामुळेच अंधभक्त बोलू लागले.
असले जरी नकटे नाक तरी,
तेच नाकाने कांदे सोलू लागले.
नाकात शिरता वारे त्यांच्या,
अंधभक्त बेलगाम होऊ लागले.
आपलीच लाल आहे म्हणीत,
अंधभक्त खुलेआम गाऊ लागले.
अंधभक्तच अंधभक्तांना,
आंधळे समर्थन देऊ लागले !
जिकडे तिकडे दांभिकतेचेच,
वेंधळे समर्थन होऊ लागले !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9078
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
30ऑक्टोबर2025
Wednesday, October 29, 2025
आठवा वेतन आयोग...,. आजची वात्रटिका
दैनिक वात्रटिका l 28ऑक्टोबर 2025वर्ष- पाचवेअंक -137वा l पाने -57
ऑल दि बेस्ट ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
ऑल दि बेस्ट
मतदान चोरीच्या प्रझेंटेशनवर,
विरोधकांचा एकच टप्पू आहे.
देशात तर होताच होता पण,
महाराष्ट्रातही एक पप्पू आहे.
कुणावर आरोप?कुणाचे उत्तर?
प्रत्येकाला इशाराही काफी आहे.
मतदान चोरीच्या प्रझेंटेशनची,
म्हणजे सरळ सरळ कॉपी आहे.
आरोपांपासून थेट उत्तरांपर्यंत,
सगळेच जरी कॉपी पेस्ट आहे !
लोकशाहीच्या पारदर्शकतेसाठी,
सगळेच ऑल दि बेस्ट आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9077
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
29ऑक्टोबर2025
Tuesday, October 28, 2025
दैनिक वात्रटिका l 27ऑक्टोबर 2025वर्ष- पाचवेअंक -136वा l पाने -57

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक...
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..
आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 27ऑक्टोबर 2025
वर्ष- पाचवे
अंक -136वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1r8FmZQHlQBvy-ZybbHfuKYdBGv_zo-p3/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 206
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या 25+ सदाबहार वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
विशेष सूचना -ज्यांना अंक डाउनलोड होणार नाही किंवा करता येणार नाही त्यांनी मला 99 23 847 269 या व्हाट्सअप क्रमांकावर मला दैनिक वात्रटिकाचा अंक पाठवा असा whatsapp करावा
मनुष्यत्वाचे व्हेरिफिकेशन...आजची वात्रटिका
-------------------
मनुष्यत्वाचे व्हेरिफिकेशन
माणसाचे मनुष्यत्व धोक्यात आलेय,
या वास्तवाची खात्री तुम्ही खुद्द करा.
संगणक माणसाला विचारू लागला,
रोबोट नाही;माणूस आहात सिद्ध करा.
सगळीकडेच यांत्रिकता वाढलेली,
त्यामुळे तर माणसाचीच कणव आहे.
उद्या रोबोट आपल्याला म्हणू शकतात,
मी नाही तूच खराखुरा यंत्रमानव आहे.
इमोजी आणि स्माईलीत रमण्यापेक्षा,
मोकळ्या मनाने हॅलो हाय करत चला !
आपल्यात माणूस उरला आहे का?
हे रोजच्या रोज व्हेरिफाय करत चला !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9076
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
28ऑक्टोबर2025
Monday, October 27, 2025
डिफेंडरचा कारनामा..... आजची वात्रटिका
निष्ठावंत कार्यकर्त्यांनो ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
निष्ठावंत कार्यकर्त्यांनो ....
आम्ही कितीही बोंबललोत तरी,
आमचे विचार कधी पटू शकतात?
कितीही टोकाचे विरोधक असले तरी,
नेत्यांचे मतभेद कधीही मिटू शकतात.
आपल्या राजकीय फायद्यापोटी,
त्यांना वेळोवेळी यु टर्न घ्यावे लागतात.
तुमच्यासारख्या चिल्लर चाल्लरांचे,
त्यांना वेळोवेळी बळी द्यावे लागतात.
निष्ठावंत व्हा, कट्टर व्हा, सच्चे व्हा,
पण स्वतःचे राजकीय बळी देऊ नका !
नेत्यांचे राजकीय वैर कधीही संपते,
तुम्ही मात्र खानदानी वैरी होऊ नका !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9075
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
27ऑक्टोबर2025
Sunday, October 26, 2025
दैनिक वात्रटिका l 26ऑक्टोबर 2025वर्ष- पाचवेअंक -135 वा l पाने -57
मोर्चांची सिद्धता.... आजची वात्रटिका
राडेशाही ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
राडेशाही
आमदारा विरुद्ध आमदार लढतो आहे,
खासदाराविरुद्ध खासदार लढतो आहे.
हे नेमके कुणाचे प्रतिनिधी आहेत ?
प्रश्न मात्र सामान्य जनतेला पडतो आहे.
आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी,
लोकप्रतिनिधींची जाहीर लढाई आहे.
सगळे काही सामान्य जनतेसाठी,
लोकप्रतिनिधींची जाहीर बढाई आहे.
सभागृहामधला वाद समजू शकतो,
लोकप्रतिनिधींचा रस्त्यावर राडा आहे !
लोकशाहीला वेठीस धरून,
त्यांच्याकडून लोकशाहीला धडा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9074
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
26ऑक्टोबर2025
Saturday, October 25, 2025
दैनिक वात्रटिका l 25ऑक्टोबर 2025वर्ष- पाचवेअंक -134 वा l पाने -60
आरक्षणाचे लोण..... साप्ताहिक सरकारनामा वात्रटिका
आरक्षणाचे अंकगणित...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
आरक्षणाचे अंकगणित
आरक्षणाच्या सोडतीवर,
राजकीय चक्र फिरू लागते.
सगळी बेरीज आणि वजाबाकी,
परस्परांचे हात धरू लागते.
कुठे कुठे हातचा सोडावा लागतो,
कुठे कुठे हातचा धरावा लागतो.
साध्या सरळ अंकगणितापेक्षाही,
वेगळाच विचार करावा लागतो.
आरक्षणाचे संरक्षण असले तरी,
वेगळी यंत्रणाही असावी लागते !
गुणाकार भागाकार झाले तरी,
अपेक्षित बेरीज दिसावी लागते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9073
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
25ऑक्टोबर2025
Friday, October 24, 2025
दैनिक वात्रटिका l 24ऑक्टोबर 2025वर्ष- पाचवेअंक -133 वा l पाने -60
दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक...
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..
आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 24ऑक्टोबर 2025
वर्ष- पाचवे
अंक -133 वा l पाने -60
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1a5dt5D5p_ZzqxsPVQFMIfvlflV5d5Zm3/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 203
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या 25+ सदाबहार वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
विशेष सूचना -ज्यांना अंक डाउनलोड होणार नाही किंवा करता येणार नाही त्यांनी मला 99 23 847 269 या व्हाट्सअप क्रमांकावर मला दैनिक वात्रटिकाचा अंक पाठवा असा whatsapp करावा
Thursday, October 23, 2025
दैनिक वात्रटिका l 23ऑक्टोबर 2025वर्ष- पाचवेअंक -132 वा l पाने -60
दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक...
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..
आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 23ऑक्टोबर 2025
वर्ष- पाचवे
अंक -132 वा l पाने -60
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1wYEG4Fqww2P_siAYnHdjHJXUlNl0PghU/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 202
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या 25+ सदाबहार वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
विशेष सूचना -ज्यांना अंक डाउनलोड होणार नाही किंवा करता येणार नाही त्यांनी मला 99 23 847 269 या व्हाट्सअप क्रमांकावर मला दैनिक वात्रटिकाचा अंक पाठवा असा whatsapp करावा
Wednesday, October 22, 2025
दैनिक वात्रटिका l 22ऑक्टोबर 2025वर्ष- पाचवेअंक -131 वा l पाने -57
मार्ग आडमार्ग....आजची वात्रटिका
----------------------------
मार्ग आडमार्ग
कधी भक्तीने लढवल्या जातात,
कधी शक्तीने लढवल्या जातात,
भक्ती आणि शक्ती पेक्षा जास्त,
निवडणुका युक्तीने लढवल्या जातात.
भक्ती,शक्ती आणि युक्तीचा,
जेव्हा त्रिवेणी संगम साधला जातो.
तेव्हा मैत्रीपूर्ण लढती ऐवजी,
बिनविरोधचा मार्ग शोधला जातो.
निवडणुकीत कधी काय चालेल?
याचा कधी अंदाज लावता येत नाही !
त्याने निवडणूकच लढवू नये,
ज्याला हातावर गांधी ठेवता येत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9072
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
22ऑक्टोबर2025
Tuesday, October 21, 2025
महाराष्ट्रातील नाट्य प्रयोग....आजची वात्रटिका
राजकीय फटाकडे...आजची वात्रटिका
Monday, October 20, 2025
बाटाबाटी आणि शुद्धीकरण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
डबल गेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
डबल गेम
राजकीय कार्यकर्त्यांच्या पिढ्या,
दर पंचवार्षिकलाच गाडू लागले.
त्यामुळेच स्वबळाच्या खुमखुमीचे,
आवाज जरा जास्तच वाढू लागले.
कार्यकर्त्यांच्या हट्टामधूनच,
पक्षीय हट्टद्धा पुरवले जातात !
उघड आणि छुपे लढवून,
कार्यकर्त्यांचे कंड जिरवले जातात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका
दैनिक मराठवाडा नेता
20ऑक्टोबर2025
Sunday, October 19, 2025
जातीय 'मोर्चे' बांधणी.......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
काळी दिवाळी.......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
दिवाळीचे स्वागत ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
दिवाळीचे स्वागत
परस्परांच्या इज्जतीचा पंचनामा,
अकलेचे लावलेले दिवे आहेत.
आपण काही फुसका फटाका नाही,
प्रत्येकाचेच स्फोटक दावे आहेत.
आपल्या स्वागताच्या तऱ्हाही,
दिवाळीला कळून चुकल्या आहेत.
जातीय द्वेषाच्या सुरसुरी सोबत,
टुचुक टुचुक अशा टिकल्या आहेत.
आरोप आणि प्रत्यारोपांचाही
नुसताच जाळ आणि धूर आहे !
आरक्षण मागण्यांची झाली ढगफुटी,
दिवाळीच्या स्वागताला महापूर आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9069
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
19ऑक्टोबर2025
Saturday, October 18, 2025
दीपोत्सव 2025...दैनिक वात्रटिका l 18ऑक्टोबर 2025वर्ष- पाचवेअंक -130 वा l पाने -561
सेम टू सेम....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
सेम टू सेम
हे त्यांना ठोकायला लागले,
ते यांना ठोकायला लागले.
सगळेच एकमेकांवरती,
गरळ ओकायला लागले.
तिकडचेही ऐकून घेतात,
इकडचेही ऐकून घेतात.
बाहिलवणारे असले की,
लोकसुद्धा बहिकून घेतात.
तिकडून यांची नक्कल आहे,
इकडून त्यांची नक्कल आहे !
जमलेली गर्दी सांगते,
गरजवंताला कुठे अक्कल आहे?
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9068
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
18ऑक्टोबर2025
Friday, October 17, 2025
दैनिक वात्रटिका l 16ऑक्टोबर 2025वर्ष- पाचवेअंक -129 वा l पाने -57
दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक...
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..
आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 16ऑक्टोबर 2025
वर्ष- पाचवे
अंक -129 वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1-xgo6Hb-oTgF1nWBvI1EhJxZrRyPpfrI/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 199
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या 25+ सदाबहार वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
लाईव्हबहाद्दर समाजसुधारक.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
लाईव्हबहाद्दर समाजसुधारक
स्वार्थी समाज सुधारक जास्त,
नि:स्वार्थी मात्र थोडे आहेत.
लाईव्हबहाद्दर समाजसुधारकांचे,
अगदी लाईव्ह असे लढे आहेत.
लाईव्ह विरुद्ध लाईव्ह आहेत,
पोस्ट विरुद्धही पोस्ट आहेत.
फॉलोवर्स आणि कमाईसाठी,
सगळ्यांचे अट्टहासही स्पष्ट आहेत.
पैसा,प्रसिद्धी आणि स्टंटबाजी,
एवढेच त्यांच्या डोक्यात आहे !
उरली सुरली विश्वासार्हताही,
लाईव्ह बहाद्दरांमुळे धोक्यात आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9067
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
17ऑक्टोबर2025
Thursday, October 16, 2025
दैनिक वात्रटिका l 15ऑक्टोबर 2025वर्ष- पाचवेअंक -128 वा l पाने -57
दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक...
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..
आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 15ऑक्टोबर 2025
वर्ष- पाचवे
अंक -128 वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/184vFq-YZm3Affi0WYrNAq0PWt1DXhVDD/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 198
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या 25+ सदाबहार वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
ऑपरेशन फोडाफोडी
आजची वात्रटिका ---------------------------- ऑपरेशन फोडाफोडी आज यांचे त्यांचे फुटले, उद्या दुसऱ्याची बारी आहे ऑपरेशन फोडाफोडी, सगळीकडूनच जारी...
-
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...















