Tuesday, November 19, 2024

दैनिक वात्रटिका l 19नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 172 वा

दैनिक वात्रटिका l 19नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 172 वा l पाने -39
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

शेवटची रात्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

शेवटची रात्र

मिळेल ती संधी साधायला,
जो तो अगदी टपून असतो.
अपप्रचार असतो उघड,
प्रचार लपून छपून असतो.

अपप्रचाराला उजेडाची तर,
प्रचाराला अंधाराची साथ असते.
नोट के बदले व्होट,
प्रत्येक गल्लीबोळ गात असते.

जशी रात्र वैऱ्याची असते,
तशी ती सोयऱ्या धायऱ्याची असते !
लोकशाहीचे गाणे ऐकणार कोण?
रात्र मुक्या आणि बहिऱ्याची असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8745
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
19 नोव्हेंबर2024
 


Monday, November 18, 2024

दैनिक वात्रटिका l 18नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 171 वा


दैनिक वात्रटिका l 18नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 171 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

कुसंगती आणि विसंगती....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

कुसंगती आणि विसंगती

जसे लोकांना कळत नाही,
तसे त्यांचे त्यांनाही कळत नाही.
कोण कोणाच्या विरोधात?
याचे उत्तर त्यांनाही मिळत नाही.

कालची विसंगती निस्तरेपर्यंत,
नवी विसंगती समोर येते आहे.
काल केलेली सावरासावर,
रोज नव्याने गोते खाते आहे.

एक है तो... सेफ है...
तरीही सर्वांच्याच तोडी नारा आहे !
बटेंगे तो कटेंगे.... चा अर्थ,
कुणी न सांगितलेलाच बरा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8744
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
18 नोव्हेंबर2024
 

Sunday, November 17, 2024

दैनिक वात्रटिका l 17नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 170 वा


दैनिक वात्रटिका l 17नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 170 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

प्रचाराच्या जाहिराती...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

प्रचाराच्या जाहिराती

जशा कुणासाठी तारक आहेत,
तशा कुणासाठी मारक आहेत.
कामगिरी आणि धोरणांपेक्षा,
जाहिराती परिणामकारक आहेत.

करावे टिचभर;दाखवावे हातभर,
अशी जाहिरातींची तऱ्हा आहे.
मीडियापासून सोशल मीडियापर्यंत,
फक्त जाहिरातींचाच मारा आहे.

शक्याबरोबर अशक्यसुद्धा,
ते जाहिरातींमधून फेकू लागले !
जाहिरातींची नशा चढवून,
सगळेच स्वप्नसुद्धा विकू लागले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8743
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
15 नोव्हेंबर2024
 

Saturday, November 16, 2024

दैनिक वात्रटिका l 16नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 169 वा

दैनिक वात्रटिका l 16नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 169 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

हम सब एक है..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

हम सब एक है..

कुणीही कसाही इशारा केला तरी,
समजदाराला तेवढेच काफी आहे.
एक है तो....सेफ है,
ही कटेंगे - बटेंगेची सॉफ्ट कॉपी आहे.

ही काही योगा - योगीची गोष्ट नाही,
ज्याचा त्याचा वेगवेगळा अर्थ आहे.
मग कुणालाही नक्की समजू शकते,
आमचाच अर्थ किती सार्थ आहे?

नकारात्मक विचार नको,
आपण सगळे सकारात्मक होऊ या !
हम सब एक है....
हा पारंपरिक नारा पुन्हा देऊ या !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8742
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
16 नोव्हेंबर2024
 

Friday, November 15, 2024

दैनिक वात्रटिका l 15नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 168 वा


दैनिक वात्रटिका l 15नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 168 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

जाहीरनाम्यांची औपचारिकता...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

जाहीरनाम्यांची औपचारिकता

सर्वांचे जाहीरनामे म्हणजे,
चक्क परस्परांच्या कॉप्या असतात.
सगळ्यांकडून जनतेला,
अगदी जगजाहीर टोप्या असतात.

जाहीरनाम्यातील आश्वासनांच्या,
थोड्याशा अलट्या पलट्या असतात.
आपला जाहीरनामा चोरल्याच्या,
त्यांच्या बोंबासुद्धा उलट्या असतात.

मित्रपक्ष बदलले गेले तरी,
जाहीरनाम्यात फरक पडत नाही !
जाहीरनामा म्हणजे औपचारिकता,
त्याच्याशिवाय काहीच नडत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8741
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
15 नोव्हेंबर2024
 

Thursday, November 14, 2024

दैनिक वात्रटिका l 14नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 167 वा


दैनिक वात्रटिका l 14नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 167 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

चिन्हांकित निवडणूक...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

चिन्हांकित निवडणूक

उमेदवार आणि पक्षापेक्षाही,
चिन्ह महत्त्वाचे ठरते आहे.
सामान्य जनता सुद्धा,
चिन्हावरच मतदान करते आहे.

कुणासाठी चिन्ह सुचिन्ह आहे,
कुणासाठी चिन्ह दुश्चिन्ह आहे.
अपक्ष उमेदवारांचे तर,
सगळ्यांपेक्षाच भिन्न आहे.

ज्यांचे ज्यांचे निवडणूक चिन्ह,
दिसायला सेम टू सेम आहे !
त्यांच्यातल्या कुणाचा तरी,
निवडणुकीत नक्की गेम आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8740
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
14 नोव्हेंबर2024
 

Wednesday, November 13, 2024

दैनिक वात्रटिका l 13नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 166 वा


दैनिक वात्रटिका l 13नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 166 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

अशी ही पाठिंब्याची तऱ्हा ..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

अशी ही पाठिंब्याची तऱ्हा

कुुणी पाठिंबा देते आहे,
कुणी पाठिंबा काढून घेते आहे.
निवडणुकीच्या धामधुमीत,
पाठिंब्याची ऐशी तैशी होते आहे.

कुणाचा पाठिंबा उघड आहे,
कुणाचा पाठिंबा आतून आहे.
कुणी पाठिंबा मागावा म्हणून,
अगदीच नटून थटून आहे.

कुणाचा पाठिंबा दिखाऊ आहे,
कुणाचा पाठिंबा विकाऊ आहे !
दिला काय?नाही दिला काय?
कुणाचा पाठिंबा टाकाऊ आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8739
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
13 नोव्हेंबर2024
 

Tuesday, November 12, 2024

दैनिक वात्रटिका l 12नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 165 वा


दैनिक वात्रटिका l 12नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 165 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

बॅग म्हणाली खोक्याला

आजची वात्रटिका
--------------------------

बॅग म्हणाली खोक्याला

त्यांचे झाले राजकारण,
ताप आपल्या डोक्याला.
धुसफुसत आणि फुसफुसत,
बॅग म्हणाली खोक्याला.

पेट्या झाल्या कालबाह्य,
चौकशी मात्र आपली आहे.
नाक्या-नाक्यावरती,
पोलिसांचीनजर टपली आहे.

घेणारे देणारे बाजूला,
धोक्यात मात्र वाहक आहे !
तुझ्याबरोबर माझीही,
बदनामी तर नाहक आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8738
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
12 नोव्हेंबर2024
 

Monday, November 11, 2024

दैनिक वात्रटिका l 11नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 164 वा l पाने -42अंक डाऊनलोड


दैनिक वात्रटिका l 11नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 164 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

लाचार नामा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

लाचार नामा

कुणीतरी जिंकते आहे,
कुणीतरी पडते आहे.
लाचारीची सवय मात्र,
मतदारांना पडते आहे.

सगळेच लाचार नसले तरी,
त्यांची संख्या मोठी आहे.
लोकशाही जिंदाबाद नारा
लाचारांच्याही ओठी आहे.

सत्तापालट झाला तरी,
लाचार कायम असतात!
स्वाभिमानी लोकांसाठी,
लोकशाहीचे नियम असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8737
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
11 नोव्हेंबर2024
 

Sunday, November 10, 2024

दैनिक वात्रटिका l 10नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 163 वा


दैनिक वात्रटिका l 10नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 163 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

घुसखोरीचा भावार्थ..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

घुसखोरीचा भावार्थ

काल तिकडे दिसणारे,
आज इकडे दिसू लागले.
जिथे ज्याला घुसता येईल,
तिथे तिथे ते घुसू लागले.

घुसखोरांच्या घुसखोरीला,
काळाचे काही बंधन नाही.
घुसखोरी ती घुसखोरी,
निष्ठा काही आंदण नाही.

प्रत्येकाच्या घुसखोरीला,
जसे वेगवेगळे नाव आहे !
तसे त्यांच्या येण्या जाण्याचा,
वेगवेगळा भाव आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8736
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
10 नोव्हेंबर2024
 

Saturday, November 9, 2024

दैनिक वात्रटिका l 9नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 162 वा


दैनिक वात्रटिका l 9नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 162 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

अप्रिय आठवण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

अप्रिय आठवण

सुटलो बुवा एकदाचे...
असाच ज्याचा त्याचा इको आहे.
झाले गेले गंगेला मिळाले,
ईडीची आठवण कुणालाच नको आहे.

कुणाला लागली शांत झोप,
कुणामागे चौकशीचा खो खो आहे.
अंगावरती फुटतो काटा,
ईडीची आठवण कुणालाच नको आहे.

कुणी अंदर;कुणी बाहर,
कुणाची तऱ्हा फेको एके फेको आहे!
धाड.. धाड..धाड करते छाती,
ईडीची आठवण कुणालाच नको आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8735
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
9 नोव्हेंबर2024
 

दैनिक वात्रटिका l 19नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 172 वा

दैनिक वात्रटिका l 19नोव्हेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 172 वा l पाने -39 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/18nApDbukudT7hlNNJ...