Thursday, November 4, 2021

दण दण दिवाळी...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

दण दण दिवाळी

आरोपावर आरोप आहेत,
सोबत टिंगल टवाळी आहे.
अकलेचे निघाले दिवाळे,
कुणाची मात्र दिवाळी आहे.

कुणाचा संपला स्टॉक,
कुणाचे फटाके बाकी आहेत !
ज्यांनी आणले नाकी नऊ,
ते फटाके तर खाकी आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
4नोव्हेंबर 2021

 

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...