Sunday, February 1, 2026

दुखवटे आणि मुखवटे..... आजची वात्रटिका


आजची वात्रटिका 
-------------------------------

दुखवटे आणि मुखवटे

त्यांचे चेहरे वेगळे आहेत, 
त्यांचे मुखवटेही वेगळे आहेत.
जसे त्यांचे आनंद सोहळे, 
तसे दुखवटेही वेगळे आहेत.

त्यांचे दुखवटे आणि मुखवटे,
यावर उलट सुलट चर्चा आहेत!
बाकी सगळे झूट निघाले,
सर्वात महत्त्वाच्या खुर्च्या आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 80
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
1 फेब्रुवारी 2026

उलटा न्याय....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

उलटा न्याय

मोठ्याचे सगळेच मोठे असते,
छोट्याचे सगळेच छोटे असते.
मोठ्याचे खोटेही खरे तर,
छोट्याचे खरेही खोटे असते.

मोठ्यांचे आणि छोट्यांचे,
दुहेरी असे मापदंड असतात.
मोठ्यांची बरोबरी करण्याचे,
छोट्यांनाही भारी कंड असतात.

मोठे कितीही चुकीचे असोत ,
मोठेच बरोबर धरले जातात !
तोंड दाबून बुक्क्यांचा मार,
छोट्यांचे कंड जिरले जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9177
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
1 फेब्रुवारी 2026

 

दुखवटे आणि मुखवटे..... आजची वात्रटिका

आजची वात्रटिका  ------------------------------- दुखवटे आणि मुखवटे त्यांचे चेहरे वेगळे आहेत,  त्यांचे मुखवटेही वेगळे आहेत. जसे त्...