दैनिक वात्रटिका
28फेब्रुवारी2021
अंक डाऊनलोड लिंक
----------------------
समानता
कायद्याची जाहीर टवाळी,
कायद्याची टिंगल आहे.
कायद्याच्या तमाशासोबत,
दंगलसुद्धा मंगल आहे.
धनदांडग्यांच्या पायाशी,
कायद्याचे इमान आहे !
फक्त न्यायालयाच्या भिंतीवर,
कायदा सर्वांना समान आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-7549
दैनिक झुंजार नेता
27फेब्रुवारी2021
शतकीय वाटचाल
लोकांनाच्या राड्यानंतर,
कोरोनाचा राडा आहे.
दशकाच्या पाढयानंतर,
शतकाचा पाढा आहे.
तरीही लोकांना कोरोनाचे,
कुठे सोयरसुतक आहे !
आता सर्वत्र कोरोनाचे,
शतकामागे शतक आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-7539
दैनिक झुंजार नेता
25फेब्रुवारी2021