Wednesday, May 27, 2020

कोरोनाची 'फुट'पट्टी

आजची वात्रटिका
--------------------------------------
कोरोनाची 'फुट'पट्टी
कोरोनाचे संकट,
अगदी नेटाने वाढते आहे.
सोशल डिस्टनसिंगचे अंतर,
फुटा-फुटाने वाढते आहे.
आधीच कोरोनामुळे,
पळता भुई थोडी झाली आहे.
सोशल डिस्टनसिंगची मर्यादा,
तेरा फुटावर गेली आहे .
संशोधकांच्या अभ्यासावर,
कोरोनाचा शेरा आहे !
जे पाळीत नाहीत त्यांच्याकडून
अगोदरच तीन-तेरा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5810
दैनिक पुण्यनगरी
27मे2020
-----------------------------
#कोरोना

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...