Sunday, May 17, 2020

सर्टिफाईड कोरोना

आजची वात्रटिका
---------------------------------------
सर्टिफाईड कोरोना
चेक पोस्टच्या नाकावर टिच्चून,
कोरोना गावोगावी घुसू शकतो
कोरोना साधासुधा नाही,
कोरोना सर्टिफाईड असू शकतो.
कोरोनाच्या मनगटावर,
होम क्वारंटाईनचे शिक्के असतील!
शहरानंतर खेड्यापाड्यांना,
कोरोनाचे जाहीर धक्के बसतील !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7287
दैनिक झुंजार नेता
17मे2020
--------------------------------------
#कोरोना

No comments:

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...