Monday, May 25, 2020

कोरोनालॉजी

आजची वात्रटिका
--------------------------------------
रोनालॉजी
कुणाकुणाला होम क्वारंटाईन,
हा स्वातंत्र्याला सुरूंग वाटतो.
काही काही बहाद्दरांना तर,
स्वतःचे घर म्हणजे तुरुंग वाटतो.
स्वातंत्र्यापेक्षा स्वैराचाराला,
कोरोनाकडून मोठा आळा आहे !
गाफील माणसांवरतीच,
कोरोनाचा पक्का डोळा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7295
दैनिक झुंजार नेता
25मे2020
-----------------------------
#कोरोना

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...