Monday, May 25, 2020

कोरोनाचे चऱ्हाट

आजची वात्रटिका
--------------------------------------
कोरोनाचे चऱ्हाट
कोरोना जसा बेलगाम,
तसा तो सैराट आहे.
लांबतच चाललेले,
कोरोनाचे चऱ्हाट आहे.
कोरानाने बाधलेला,
उद्याचा प्रत्येक नियम असेल !
कोरोनाचा सुंभ जळाला तरी,
त्याचा पीळ कायम असेल !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5808
दैनिक पुण्यनगरी
25मे2020
-----------------------------
#कोरोना

No comments:

आशा आणि निराशा .प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका..

आजची वात्रटिका -------------------------- आशा आणि निराशा ज्याला ज्याला लागली आशा, त्याच्या पदरी निराशा येऊ शकते. सत्तेच्या राजकारणात, हे तर...