Sunday, May 31, 2020

लॉक डाऊन 5.0

आजची वात्रटिका
------------------------------------
लॉक डाऊन 5.0
घरी रहा,सुरक्षित रहा,
मूलमंत्र हाच आहे.
कोरोनाच्या कृपेने,
लॉक डाऊन पाच आहे.
लॉक डाऊनची मर्यादा,
कंटेन्मेंट झोन आहे.
वरून लॉकडाऊन,
आतून अनलॉक वन आहे.
स्वतंत्र व्हा,स्वैराचारी नको,
यातला रागही लटका आहे !!
भक्तांच्या मदतीला येण्यास
आता देवांचीही सुटका आहे!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5814
दैनिक पुण्यनगरी
31मे2020

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...