Sunday, May 17, 2020

रेनकोट म्हणाला छत्रीला

आजची वात्रटिका
---------------------------------------
रेनकोट म्हणाला छत्रीला
तुझ्या माझ्या उत्पादनाला,
कोरोनामुळे ऊर्जा आहे.
कोरोनामुळे आपल्याला,
अत्यावश्यक सेवेचा दर्जा आहे.
आपण सिझनेबल असलो तरी,
कोरोना काही रिझनेबल नाही !
अजून तरी एक्सपायरी डेटचे,
कोरोनावरती लेबल नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5800
दैनिक पुण्यनगरी
17मे2020
----------------------------------
#कोरोना

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...