Sunday, May 24, 2020

कोरोनोत्तर जग

आजची वात्रटिका
--------------------------------------
कोरोनोत्तर जग
कोरोनाच्या रोगाचे जगावर,
अंतापर्यंत परिणाम घडतील.
कोरोनापूर्व आणि कोरोनोत्तर,
असे जगाचे कालखंड पडतील.
कोरानाच्या दहशतीच्या कथा,
कायम सांगितल्या जाऊ शकतात !
माणसाच्या नव्या पिढ्या,
मास्कसह जन्माला येऊ शकतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5807
दैनिक पुण्यनगरी
24मे2020
-----------------------------
#कोरोना

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...