Wednesday, May 20, 2020

वेडी आशा

आजची वात्रटिका
--------------------------------------
वेडी आशा
दारूडयांच्या रडापडीचा
सरकारला पान्हा फुटतो आहे.
आतातर प्रत्येक दारुडा,
अर्थव्यवस्थेचा कणा वाटतो आहे.
जे पेताड नाहीत त्यांच्या कपाळी,
उगीच चिंतेची रेषा आहे !
ज्याला स्वतःला सावरता येईना,
त्याच्याकडून अर्थव्यवस्था सावरायची,
सरकारला वेडी आशा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7290
दैनिक झुंजार नेता
20मे2020
-------------------------------
#कोरोना

No comments:

उदात्तीकरणाचे प्रयोग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- उदात्तीकरणाचे प्रयोग अनिष्ट आणि घातक परंपरांचे, एक मात्र खूप छान असते. अनिष्ट आणि घातक परंपरांना, ...