Friday, May 8, 2020

कोरोनाशासित जग

आजची वात्रटिका
------------------------
कोरोनाशासित जग
कोरोना कोरोना म्हणून,
फक्त ऊर बडवू नका.
ज्याला काही संशय येतोय,
त्याने तो दडवू नका.
नसत्या संशयाला बळी पडून,
संशयकल्लोळ वाढवू नका.
घोळात नवे घोळ घालून,
नसते घोळ वाढवू नका.
संशयकल्लोळ व घोळात घोळ,
कोरोनासाठी पोषक आहे !
अत्यांत थोड्या काळात,
कोरोना जगाचा शासक आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5791
दैनिक पुण्यनगरी
8मे2020
---------------------------------------
#कोरोना

No comments:

उदात्तीकरणाचे प्रयोग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- उदात्तीकरणाचे प्रयोग अनिष्ट आणि घातक परंपरांचे, एक मात्र खूप छान असते. अनिष्ट आणि घातक परंपरांना, ...