Friday, May 29, 2020

कोरोना अपडेट



आजची वात्रटिका
-------------------------------------
कोरोना अपडेट
कोरोनाचे संकट,
खरोखरच मोठे आहे.
कोरोनाचे नाव मोठे,
पण लक्षण खोटे आहे.
कोरोना आपली चाल,
लक्षात येऊ देत नाही.
साधा मोकळा श्वासही,
कोरोना घेऊ देत नाही.
जिथे जाईल तिथे,
कोरोना सेट होतो आहे !
आपल्यापेक्षाही आधी,
कोरोना अपडेट होतो आहे!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5812
दैनिक पुण्यनगरी
29मे2020
-----------------------------
#कोरोना

No comments:

daily vatratika...29jane2026