Friday, May 1, 2020

नवी जबाबदारी

आजची वात्रटिका
------------------------------------
नवी जबाबदारी
पुरोगामी महाराष्ट्राचे
कर्ज चुकवायाचे आहे.
महाराष्ट्राचे पुरोगामीत्व,
सर्वांना टिकवायचे आहे.
विचारी महाराष्ट्र,
नवविचारी बनला पाहिजे.
हा नवा विचार स्वतः
अंमलात आणला पाहिजे.
दिले वचन पाळतो,
ही महाराष्ट्राची ख्याती आहे !
नवविचार रुजविते-जोजविते,
अशी महाराष्ट्राची माती आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7272
दैनिक झुंजार नेता
1मे2020
--------------------------------
#कोरोना

No comments:

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 301वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 301वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1S4SAD0tMR_eqzmeUqaS...