Tuesday, August 17, 2021

अंगार आणि भंगार..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- अंगार आणि भंगार

अंगाराचे आणि भंगाराचे,
खूप खंगार नाते आहे.
राजकारणात कुठे ना कुठे,
रोज हीच घोषणा होते आहे.

आपला तो अंगार,
दुसऱ्याचा तो भंगार असतो!
आपला डंगार असला तरी,
त्यांच्यासाठी तो अंगार असतो !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------
फेरफटका-7677
दैनिक झुंजार नेता
17ऑगस्ट 2021
 

daily vatratika...11april2025