आजची वात्रटिका
-------------------------
कापूस म्हणाला उसाला
तू गोड लागल्यामुळे,
तुला मुळासकट खाल्ले जाते.
पश्चिम महाराष्ट्राच्या दबावाने,
सरकारसुद्धा हालले जाते.
शेंबडे पोरही सांगेल,
तुझ्या-माझ्यात दुजा 'भाव' आहे !
अजूनही वेळ गेलेली नाही,
सुधारणेला आणखी वाव आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
चिमटा-2780
दैनिक पुण्यनगरी
16 नोव्हेंबर 2011
No comments:
Post a Comment