आजची वात्रटिका
--------------------
कॉपी राईट
रागाने लाल झाला,
नाशिकचा टेबल.
नाशिकच्या टेबलावर,
कॉपीराईटचे लेबल.
टेबलाचा पवित्रा बघून,
छत्रीलाही स्पार्क आहे.
दांडा हलवित म्हणाली,
मीच माझा ट्रेडमार्क आहे.
कॉपीराईट, ट्रेडमार्कचा,
नवाच प्रश्न उभा आहे !
या चमत्काराचे कारण,
खरात बाबा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------
फेरफटका- 9458
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
16 नोव्हेंबर 2026
--------------------------
https://suryakantdolase.blogspot.com/?m=1
*सूर्यकांती*
मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांच्या लेखणीतून उतरलेल्या
अकरा हजारांपेक्षा जास्त दणदणीत, खणखणीत आणि सणसणीत अशा
सदाबहार वात्रटिका. वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा
No comments:
Post a Comment