Monday, August 16, 2021

चमचेगिरी ...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
चमचेगिरी
चमचे चावळू लागतात,
चमचे बावळू लागतात.
नको तिथे तोंड घालून
चमचे ढवळू लागतात.
हलवा-हलवी,ढवळा-ढवळी,
हे चमच्यांचे कार्य आहे !
याची त्याची
चमचेगिरी केल्याशिवाय
चमच्यांना कुठे स्थैर्य आहे ?
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6168
दैनिक पुण्यनगरी
6मे 2021

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...