Friday, November 5, 2021

अबब कारी निर्णय....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
अबब कारी निर्णय
केंद्र सरकारचे पोट,
निवडणुकात पाडले आहे.
पाच रुपयांनी पेट्रोल,
म्हणूनच खाली ओढले आहे.
पेट्रोल बरोबर डिझेलही,
दहा रुपये स्वस्त झाले आहे!
केंद्राला बसला धक्का,
सिलेंडर अस्वस्थ झाले आहे!!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6313
दैनिक पुण्यनगरी
5नोव्हेंबर2021

 

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...