Friday, September 24, 2021

देव - देव्हारा..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

देव - देव्हारा

भक्तांच्या भक्तिमार्गात,
खूप मोठे खड्डे झाले.
हल्ली देवस्थानं म्हणजे,
राजकीय अड्डे झाले.

देव झाले अश्रित,
मंदिर त्यांचा निवारा आहे!
राजकीय कुरघोडीमुळे
देवळांचा देव्हारा आहे !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6273
दैनिक पुण्यनगरी
24सप्टेंबर 2021

 

बिनखात्याचे मंत्री .....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- बिनखात्याचे मंत्री बिनखात्याचे का असेना, शेवटी मंत्रीपद मंत्रीपद आहे. सत्ता किती महत्त्वाची असते...