Saturday, December 18, 2021

' पे ' पर....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

' पे ' पर

याच्या-त्याच्या माथ्यावरती,
फोडाफोडीचे खापर आहे.
आजच्या प्रश्नपत्रिका म्हणजे,
खरोखरच 'पे' पर आहे.

जशी स्पर्धा;तशी रेटा-रेटी,
कुणालाच खेद वाटला नाही!
याचा शोध घेणे सोपे जाईल,
कोणता पेपर फुटला नाही?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6355
दैनिक पुण्यनगरी
18डिसेंबर2021

 

No comments:

daily vatratika...29jane2026