Tuesday, December 21, 2021

दगडापेक्षा वीट मऊ...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

दगडापेक्षा वीट मऊ

गल्लीच्या निवडणुकीत,
दिल्लीचे मुद्दे गाजवतात.
गावो-गावच्या पारावर,
एकमेकांना लाजवतात.

गल्लीचा गोंधळ,
दिल्लीत साजरा होतो.
ऐकणारा आणि बघणारा,
लाजरा बुजरा होतो.

कुठलाही मुद्दा असा,
कुठेही चिवडून होतो!
तरीही कुणीतरी पडून,
कुणीतरी निवडून येतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6357
दैनिक पुण्यनगरी
21डिसेंबर2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 281 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 281 वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Ea76CT5y6gMt8dveje...