Friday, December 17, 2021

वेडगळपणा...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

वेडगळपणा

कुणा-कुणाला भारतीय जनता,
सपशेल वेडगळ वाटू लागली.
कुणा-कुणाला लोकशाहीच,
सपशेल अडगळ वाटू लागली.

लोकशाहीला अडगळीत टाकू,
हा तर शुद्ध खोडगळपणा आहे !
भारतीय जनता वेडगळ आहे,
हा ही शुद्ध वेडगळपणा आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6354
दैनिक पुण्यनगरी
17डिसेंबर2021

 

No comments:

daily vatratika...29jane2026