Wednesday, December 8, 2021

तोल मोलके बोल..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

तोल मोलके बोल

ज्याला जसे निजायचे आहे,
तसे ते खुशाल निजू शकतात.
निजणे आणि झोपणे यावरूनही,
राजकीय गदारोळ माजू शकतात.

मराठी वळवावी तशी वळते,
हा बचाव कामा येऊ शकतो !
नसता पराचा कावळा होऊन,
तुमचा शेलार-मामा होऊ शकतो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7781
दैनिक झुंजार नेता
8डिसेंबर2021

 

No comments:

daily vatratika...29jane2026