Wednesday, December 15, 2021

निवडणूक पूर्व तयारी....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

निवडणूक पूर्व तयारी

आया - बाया सजल्या,
म्हातारे-कोतारेही सजले.
जेंव्हा एकदाचे,
निवडणुकांचे बिगुल वाजले.

कुणी करतोय भांगडा,
कुणाचा डिस्को दांडिया आहे.
बाशिंग बांधून बसलेला,
आपला 'यंग इंडिया' आहे.

निवडणुकीत वापरायच्या,
युक्त्यासुद्धा नामी आहेत !
आरक्षणाच्या रक्षणासाठी,
बाया - बापड्या डमी आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------------
फेरफटका-7788
दैनिक झुंजार नेता
15डिसेंबर2021

 

No comments:

daily vatratika...29jane2026