Thursday, December 30, 2021

कच्चा दुवा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

कच्चा दुवा

केंद्र आणि राज्यातला,
राज्यपाल दुवा असतो.
तरीही राष्ट्रपती राजवटीचा,
सतत बागुलबुवा असतो.

बागुलबुवा तो बागुलबुवा,
तरीही तो सच्चा वाटतो!
राज्यपाल नावाचा दुवा,
सच्चा तरीही कच्चा वाटतो !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6367
दैनिक पुण्यनगरी
30डिसेंबर2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...