Sunday, December 5, 2021

गैरसमज....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- गैरसमज हा निष्कर्ष खरा नाही, मराठी कविता टुकार आहे. संमेलनात घुसलेली कविता मात्र, बेक्ककार आणि भिकार आहे. आपल्या कर्तव्यापासून मराठी कविता चुकार आहे कविता चिकार होऊनही, टोळकेशाहीचा स्विकार आहे. कविता जशी पेताड आहे, तशी कविता गंजाटी आहे. माय मराठीची नाही, घुसखोरांची कूस वांझोटी आहे. सच्चे कवी होतात खट्टू, वशिल्याचे तट्टू अधिक असतात! हा गैरसमज काढून टाका सगळेच प्रातिनिधिक असतात!! -सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 --------------------------------------- फेरफटका-7778 दैनिक झुंजार नेता 5डिसेंबर202
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...