Sunday, December 5, 2021

पक्षीय साहित्य संमेलन...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

पक्षीय साहित्य संमेलन

संमेलनात राजकारणाने,
नसता कळस गाठू नये.
कुणी पक्षीय साहित्य संमेलन,
भरवले तर नवल वाटू नये.

आजचा छुपा कार्यक्रम,
उद्या उघडपणे होवू शकतो!
संमेलनाचा हा नवा प्रवाह,
नवे राजकीय वळण देऊ शकतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6342
दैनिक पुण्यनगरी
5डिसेंबर2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...